उल्लेखनीय कामगिरी व सामाजिक उपक्रम
उल्लेखनीय कामगिरी व सामाजिक उपक्रम
"हार्दिक अभिनंदन".
आपले समाज बांधव, एबीपी माझा चे पत्रकार श्री.मंदार गोंजारी यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारिता व वार्तांकनाबद्दल मानाचा रामनाथ गोयंका फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारीतेचा "रामनाथ गोयंका" पुरस्कार राष्ट्रपती महामहीम मा.द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मिळाला आहे. हे आपल्या समाज बांधवांना गौरवास्पद आहे. त्याबद्दल श्री.मंदार गोंजारी यांचे मनःपूर्वक"हार्दिक अभिनंदन" व पुढील वाटचालीसाठी "हार्दिक शुभेच्छा." उत्तरोत्तर अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक - समस्त सनगर समाज महाराष्ट्र
नवी मुंबई सणगर समाज सेवा सस्थे च्या वतीने कोपखैरणे येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला कौटुंबिक स्न्हेह मेळावा .
नवी मुंबई सणगर समाज संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी कोपरखैरणे नवी मुंबई येथील शेतकरी समाज हॉल मध्ये कौटुंबिक स्नेहमेळावा हळदी कुंकू व मोफत वैधकीय शिबीर (डॉक्टर श्री संतोष पांढरे व डॉक्टर अग्रवाल यांची वैधकीय टीम )करमणुकीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले..
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्याचे मा.खासदार डॉक्टर श्री संजीव गणेशजी नाईक*साहेब ,अखिल भारतीय सणगर समाज सेवा संस्थेचे (शिखर संस्था) अध्यक्ष श्री भरत शेठ राऊत व श्री सतिश रामचंद्र सणगर मा.न्यायाधिश उच्च न्यायालय मुंबई याचे स्वीय सचिव हे उपस्थित होते ...
तर प्रमुख उपस्थिता मध्ये श्री काशिनाथजी कचरे साहेब मा.सहाय्यक पोलीस आयक्त,श्री हरिश्चन्द्र परमाळे मा.सहाय्यक पोलीस आयक्त मुंबई ,.मा.श्रीनामदेवराव सासणे,अध्यक्ष सांगली जिल्हा सणगर समाज,मा.श्री आनंदराव नवाळे,सचिव अ.भा.सणगर समाज सेवा संस्था (शिखर संस्था), श्री एन.आर.बदडे गुरुजी,मा.श्री संजयजी डमकले सातारा, हे उपस्थित होते सणगर समाज प्रगती संस्था ठाणे, मा.श्री हिंदुराव गवरे,,मुंबई मंडळाचे सचिव श्री राजेंद्र गवरे **मा.श्री,दत्ता गोंजारी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड सणगर समाज*सेवा संस्था पुणे,मा.सौ शितल मंगेश कारंडे,सचिव भाजपा महिला मोर्चा ठाणे या मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच नवी मुंबई सणगर समाजाला कायम मदत करणारे वागळे इस्टेट विभागातील सणगर समाज बांधव श्री महेश कारंडे,श्री भगवान गवरे, श्री उत्तम राऊत,श्रीा सुशील राऊत,श्री चिंतामणी लिमकर,श्री राजू गोजारी,श्री पंकज गोजारी.व इतर त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते..सदर मेळाव्यास महाराष्ट्रातील अनेक* जिल्ह्या मधून अनेक प्रमुख समाज बांधव व भगिनी या कार्यक्रमांस आवर्जून उपस्थीत राहून स्न्हेह सोहळयाचा आंनद घेतला...
सदर मेळाव्याचे उदघाटन मा.खासदार डॉक्टर सजीवजी गणेश नाईक यांनी नारळ वाढवून मोफत आरोग्य शिबिराचे व दीप प्रवज्वलन करुन केले, या प्रसंगी त्यांनी समाजा च्या वाटचाली बाबत धावता आढावा घेऊन एकत्र राहण्या करिता अनेक समाज उपयोगी गोष्टी बाबत मार्गदर्शन केले ,नवी मुंबई सणगर समाज सेवा संस्थेला समाज मंदिरा करिता सिडको मार्फत भूखंड मिळवून देण्याकरिता सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन संपूर्ण नाईक परिवार हा पूर्वी ही या संस्थेच्या पाठीमागे होता व या पुढे ही या संस्थेच्या उन्नतिकारिता कायम.बरोबर राहून संस्थेला वेळोवेळी आवश्यक ती मदत नक्कीच करतच राहील असे आश्वासन दिले.
या नंतर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या मध्ये अजेंडा प्रमाणे सर्व विषय मांडून मंजूर करण्यात आले तसेच अध्यक्षाच्या परवानगीने समाजातील दोन समाज बांधवाना कार्यकारी सदस्य म्हणून एकमताने मंजुरी देण्यात आली.
उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद कारंडे यांनी संस्थेला कार्यक्रमाला विशेष आर्थिक मदत करणारे डॉ.सचिन सणगर यांचे व लोक कलावंत श्री डॉ.गणेश चंदनशिवे यांचे विशेष आभार मानले..
या नंतर संस्थे मार्फत प्रसिध्द समालोचक श्री हरीश मोकल यांचा खेळ रंगाला पैठनीचा* हा महिलांच्या आवडीचा मनोरंजनात्मक खेळ कार्यक्रम झाला उपस्थित सर्व महिलांनी या मध्ये भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला, समाजातील विजेत्या दोन भगिनी अनुक्रमे सौ पूजा दिनेश राऊत व सौ.रेवती प्रतिक राऊत यांनी या खेळामधून मानाची पैठनी जिंकली . खास रुचकर असे स्न्हेह भोजन दुपारी पार पडले.
दुपारच्या सत्रा मध्ये प्रसिद्ध लोक कलावंत डॉक्टर श्री गणेश चंदनशिवे यांचा लोकगीतावर आधारित संगीताचा एक बहारदार कार्यक्रम सादर केला गेला . डॉक्टर श्री गणेश चंदनशिवे यांनी लोकगीतावर आधारित समाज जागृती कशी केली जाते या बाबातची बहारदार लोक संगीत गाणी सादर केली .सर्व समाज बांधवानी सर्व गाण्यांना उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन लोकसंगीत गाण्यांचा आनंद लुटला ...
लोकलावंत .डॉक्टर श्री गणेश चंदनशिवे यांचा योग्य सन्मान घोगडी पुष्प गुच्छ व संस्थेचे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार
संस्थे मार्फत करण्यात आला..
संस्थे मार्फत समाजातील प्रमुख पाहुणे,आमंत्रित मान्यवर,शालेय विदयार्थी यांना भेटवस्तू व समाजात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार मूर्ती चा सत्कार शाल श्रीफळ,पुष्प गुच्छ व संस्थेचे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा येतोचित सत्कार करण्यात आला. या मध्ये प्रामुख्याने संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. श्री प्रसाद कारंडे यांची जगातील नामवंत अशा मुंबई विद्यापीठात कुल सचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल..व त्याची डॉक्टर कन्या तन्वी प्रसाद कारंडे यांना नामवंत शासकीय विदयालयात एम.एस.नेत्र विशारद म्हणुन मेरिट वर ऍडमिशन मिळाल्या बदद्दल...तसेच सौ रेखाताई परमाळे यांची महिला संचालिका म्हणूंन जयभवानी अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी मध्ये नियुक्ती झाले बाबत.व सौ.प्रियांका बाळासाहेब पिचके/खामकर यांनी घर संसार सांभाळून प्रतिष्ठीत शासकीय परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची विक्रीकर निरीक्षक मुंबई येथे नियुक्ती झाले बाबत,तसेचे कु.प्रधुम्न प्रवीण राऊत यांची वॉटर पोलो स्पर्धेत कार्य प्रविण्य मिळाल्या बाबत व समाजास अभिमानास्पद असे राष्ट्रपती पदक विजेते ,येरावडा कारागृह अधीक्षक पदी नियुक्ती झाले बाबत मा.श्री अनिल हणमंत खामकर यांचा येथोचीत सत्कार शाल श्रीफळ पुष्प गुच्छ व संस्थेचे सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला..
सोहळ्याच्या अखेरच्या सत्रात अनेक चित्रपट व मराठी टी व्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध सिने /टी व्ही अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांच्या उपस्थीतित महिलासाठी खास हळदी कुंकू समारंभ तसेच त्यांच्या हस्ते महिलांना वाण व मान्यवरा चा सत्कार तसेच पैठणी जिंकणाऱ्या दोन महिलाना पैठणी चे बक्षीस देण्यात आले..(अभिनेत्री शिल्पा ठाकरे यांची सध्या सन मराठी या मराठी चॅनल वर नवी जन्मेन मी या मराठी सिरीयल मध्ये स्वानदी ची प्रमुख भूमिका करीत आहेत)
प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सणगर समाज सेवा संस्थेचे (शिखर संस्था) अध्यक्ष श्री भरत शेठ राऊत यांनी व मा. श्री काशीनाथ कचरे यांनी समाज एकसंघ राहण्या करिता व समाजाची उन्नती होने करिता तसेच.एकमेकातील हेवे दावे मिटविन्या करिता बहुमूल्य असे मार्गदर्शन केले समाजप्रगति करिता आम्ही सदैव तयार आहोत असे ही त्यांनी सांगितले..अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल राऊत यांनी नवी मुंबई सणगर समाज संस्थे चे समाज मंदिराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्या करिता पाठपुरावा करण्यात येणार असून त्याचे बरोबर समजतील वाढत चाललेले गैरसमज दूर करण्या करिता प्रतिष्ठीत समाज बांधवानी एकत्र बसून योग्य मार्ग काढावा असे अहवान केले. सदर स्न्हेह मेळावा अंत्यत यशस्वी करण्याचे श्रेय त्यांचा सर्व कमिटी मेंबर्स व सर्व नवी मुंबई तील समाज समाज बांधव व भगिनींना दिले, अशीच एकसंघ राहिलो तर नक्कीच समाज मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले शिवाय राहणार नाही असे सागितले..
समारंभाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मा.श्री चंद्रशेखर खामकर यांनी केले त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यातून आलेले आमंत्रित समाज बांधव /भगिनी कार्यक्रमांस रंगत आणणारे प्रसिध्द लोकलावंत .डॉक्टर श्री गणेश चंदनशिवे व सुप्रसिद्ध सिने /टी व्ही अभिनेत्री शिल्पा ठाकरे तसेच प्रसिध्द समालोचक श्री हरीश मोकल यांचे व या कार्यक्रमास ज्यांनी या कार्यक्रमांस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली अशा सर्वांचे आभार माणून सोहळ्याची सांगता अध्यक्षाच्या परवानगीने केली..
या अप्रतिम कार्यक्रामाचे अप्रतिम असे संपूर्ण दिवस भर सूत्र संचालन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री बाळासाहेब सोळसे यांनी केले..
समाजचा स्नेह सोहळा कसा यशस्वी होऊन कायम समाज*बांधवाच्या आठवणीत असावा याचा वस्तूपाठ म्हणजे नवी*मुंबई सणगर समाजाचा हा कौटुंबिक स्न्हेह सोहळा होय.
व तो यशस्वी करण्याकरिता मेहनत घेणारे सदैव समाजाबरोबर असलेले नवी मुंबई सणगर समाज सेवा सस्थेचे अध्यक्ष श्री अनिल राऊत, उपाध्यक्ष डॉ.श्री प्रसाद कारंडे,सचिव श्री चंद्रशेखर खामकर खजीनदार श्री चंद्रशेखर पानसांडे, उपसचिव राजेंद्र खामकर, कार्यकारणी सदस्य निलेश गोंजारी,श्री सुरेश कारंडे,राजेश शेडे, श्री युवराज राऊत,बाळासाहेब सोळसे, श्री चंद्रकांत (आबा)खामकर,सौ राधा खामकर,श्री विष्णू सासणे श्री, निवृत्ती ढोबळे,श्री पांडुरंग ढोबळे तसेच संस्थेचे सल्लागार गुरुवर्य श्री मारुती दाजी पांढरे श्री यशवंत ढोबळे, श्री दिलीप गोंजारी, डॉ.श्री झुंझारराव बदडे,श्री संजय कुमार ढोबळे, श्री शंकर धुकटे हे सर्व समाज बांधव होय .
संस्थेचे ब्रीदवाक्य एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असून ते हम सब एक है या तत्वावर तन मन,व धनाने एकरूप होऊन काम करून तो सोहळा यशस्वी करतात..
जय हिंद ,जय अहिल्या,जय सणगर
धन्यवाद 🙏🙏
अनिल राऊत
*अध्यक्ष.
नवी मुंबई सनगर समाज सेवा संस्था*
समस्त सणगर समाज मायणी च्या समाज सभागृहाच्या उद्घाटन.
समस्त सणगर समाज मायणी च्या समाज सभागृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवार दि 1/03/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यसम्राट लोकनेते श्री सुरेंद्रदादा गुदगे (मा जिल्हा परिषद सदस्य सातारा, चेअरमन मायणी अर्बन बँक मायणी,चेअरमन मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ मायणी) यांचे शुभहस्ते संपन्न झाला
यावेळी माननिय सरपंच सौ सोनाली रणजित माने सो, माननिय उपसरपंच श्री दादासो शिवाजी कचरे साहेब सो व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मायणी तसेच माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच मायणी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती उपस्थित होते
यावेळी समस्त सणगर समाजाने एकजूटीने कार्यक्रम यशस्वी केला .
डॅा. प्रसाद कारंडे यांची
मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती
*नवी मुंबई सनगर समाज समाज सेवा संस्थेचे संथापक उपाध्यक्ष माझे परम स्नेही सन्मानिय
डॅा. प्रसाद कारंडे यांची
मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल
नवी मुंबई सनगर समाजा तर्फे तसेच अखिल भारतीय सनगर समाजा तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा💐💐*
जब तक शिक्षा का मकसद नौकरी पाना होगा तब तक सामाज मे नौकर ही पैदा होगे,मलिक नही. .या विचारावर अढळ असणारे
व सतत आपल्या समाजाने उद्योगपती व्हावे याचा प्रत्येक वेळी मुलमंत्र देउन प्रभोधन करणारे तसेच इतर कोणत्या समाज संस्थेने हे काम बरोबर नाही केले म्हणून उठ सुठ आदळ आपट न करता व मी बोलेल तेच खरे असा कधीही बडेजावं न करता कोणतिहि समस्या असल्यास सामोपचारणे यशस्वी तोडगा काढण्यावर भर असणारे व नवी मुबंई सनगर समाजने आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती कशी होईल या कडे लक्ष केंद्रित करावे या करता सतत पाठपुरावा करून अनेक समाजउपयोगी कार्य करून समाजाला मार्गदर्शन करणारे असे माझे स्नेहीना आज देशातील वा जगातील नामाकीत अशा मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदी नियुक्ती झाल्या बद्दल पुनः एकादा अभिनंदन💐💐
या पूर्वी त्यांनी माटुंग्यातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था म्हणजेच व्हीजीटीआय मधील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात सहयोगी प्राध्यापक व मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा व मुल्यमापन मंडळांचे प्रभारी संचालक म्हणूनही काम करन्याची संधी मिळाली होती तेव्हाच नवी मुंबई सनगर समाजाने त्यांच्या घरी जाऊन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव व्हा म्हणून सत्कार व शुभेच्छा दिल्या होत्या त्या आज सत्यात उतरल्याने खरा आनंद संपूर्ण नवी मुंबई सनगर समाजास झाला आहे..
डॉक्टर प्रसाद कारंडे याचे कडे बुद्धीमत्ता तर आहेच, प्रचंड उर्जा आहे, काही करायची, परिस्थिती बदलावयाची धमकहि आहे, कोणत्याही प्रसंगाला तोंड देत त्यावर मात करायची व सदैव पुढे जायची विजुगिषु वृती आहे, विशाल दृष्टिकोनही आहे, ज्या समाजात जन्माला आलो त्याच्या उत्थानाची प्रबळ इच्छा आहे. समाजकार्य किती तर्कदृष्ट्या परंतु भावना सांभाळून विशाल दृष्टिकोनातूनही संयमीपणे करता येईल याचे तारतम्य आहे हे काहींना माहित असताना ही काही प्रस्थापित लोक समाज हिताचा फायदा कायम स्वरूपी आपल्या सर्व समाजाला होणार असे माहित असतानाही डॉक्टर प्रसाद कारंडे यांचा समाज हिताचा, तंटा मुक्तीचा सल्ला ही मानत नाही तेव्हा मनाला यातना होतात!! असो अशा प्रस्थापिताना समाज हित लवकरात् लवकर समजो ही पांडुरंग माऊली चरणी प्रार्थना.🙏 .
*डॉक्टर प्रसाद कारंडे याना मिळालेला बहुमान हा नवी मुंबई
सनगर समाज संस्थेचाच गौरव आहे हे आम्ही मानतो..ते नवी मुंबईचे असल्यामुळे भविष्यात त्याच्या अनुभवाचा लाभ निश्चितच कोणत्याही एका संस्थेस न होता तो संपूर्ण समाज बांधवांना ,संस्थाना व सर्वसामान्य व्हावा हिच आमची तुमच्या वतिने ग्यारंटी आहे.
एक आदर्श आणी कर्तृत्व संपन्न वैक्तीमत्व म्ह्णून भावि पिढी आपला आदर्श सदैव घेतील यात तील मात्र शंका नाही.
आज त्यांची मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून जी नियुक्ती स्वकर्तृत्वार झाली आहे याचा अम्हाला अभिमान आहे, त्याबद्दल पुनः एकदा मनापासून अभिनंदन व शुभेच्छा
दिनांक 17/08/2024 रोजी सर्व विश्वस्त यांच्या मधुन माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक पतसंस्था मर्या.पंढरपुर चेअरमन पदी बिनविरोध निवडुण झाल्याबद्दल त्यांचे समस्त दैव सणगर मंडळी पंढरपुर, अ.भा.सणगर समाज मठ ट्रस्ट पंढरपूर, आम्ही सणगर टिमवर्क, अ. भा. सणगर समाज कुटुंब अॅप, सर्व कार्यकरणी व श्री दत्तात्रय पांडुरंग कमले यांच्याकडून हार्दिक अभिनंदन अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शिव शुभेच्छा
सातारा.पुणे.बीड सांगली सोलापूर कोल्हापूर असे 6 जिल्हा 68 गावभेट दौऱ्यात आम्ही सर्वजण समाज बांधवास निमंत्रण देण्यास गेलो असता तेथील समाज बांधवाकडुन आम्हास चहा नाष्टा स्नेहभोजन व राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि आमचा यथोचित सन्मान करण्यात आला प्रत्येक ठिकाणी आमचे या गावभेट दौऱ्याचे कौतुक करण्यात आले व सर्व टिमवर्क लहाना पासून ते वयोवृद्ध पर्यंत समाज बांधव यांची समाजातील समाज सेवेची संघटित टिमवर्क फळी पाहून आनंद व्यक्त करत होते एक दिवस समाजासाठी म्हणून सहकुटुंब सहपरीवार सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचे मत व्यक्त करत होते...
श्री चंद्रकांत सनगर साहेब यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल "श्री मल्हार रत्न " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
"श्रीमंत राजे मल्हार होळकर"यांच्या जयंतीनिमित्त
"धनगर माझा"यांनी पुण्यश्लोक फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे व श्रीमंत सुभेदार मल्हार होळकर जयंतीचे औचित्य साधून डॉ. प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या हस्ते व डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे उपस्थित पुणे येथे समस्त सनगर समाज पुणे अध्यक्ष श्री चंद्रकांत सनगर साहेब यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल "श्री मल्हार रत्न " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री चंद्रकांत सनगर साहेब यांचे आम्ही सनगर कुटुंब ॲप, आम्ही सणगर कम्युनिटी कडून हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.
सणगर समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फंड ट्रस्टमार्फत वीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
अखिल भारतीय सणगर समाज सेवा मंडळ (शिखर संस्था) चे अध्यक्ष मा.भरतशेठ राऊत सातारा,सचिव मा. आनंदराव नवाळे साहेब,माजी सचिव एन.आर. बदडे सर , विश्वस्त मा.श्रीमती रेखाताई परमाळे, विश्वस्त मा.श्री विजय ज्ञा.सणगर ,सल्लागार मा. सौ.विजया पिचके यांचे मार्फत सणगर समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण फंड ट्रस्टमार्फत वीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली गेली.*
देणाऱ्याने देत जावे…
देणाऱ्याने देत जावे…
देणाऱ्याने देत जावे…
सौ. राजश्री सादिगले या माझ्या पुणे येथील
पेशाने परिचारिका असलेल्या समस्तच्या सल्लागार..
डॉक्टरच्या उपचाराच्या सेवेपेक्षाही परिचारिकेचा धर्म हा अधिक पवित्र मानला जातो. डॉक्टरला ‘ब्रदर’ म्हटले जात नाही. पण परिचारिकेला ‘सिस्टर’ म्हटले जाते. इतकी कौटुंबिक आत्मीयता परिचारिकेच्या सेवेत आहे.
अशा या सिस्टर असलेल्या सौ. राजश्री सादिगले यांनी भोसरी येथील पिंपरी चिंचवड सणगर समाजाच्या कौटुंबिक स्नेहमेळाव्यात प्रथम रू. १२,०००/- इतकी रक्कम दि. ०१/०५/२०१९ रोजी समाजाच्या बांधकामासाठी दिली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा संस्थेस रू. १३,५५५/- अशी एकूण रू. २५,५५५/- अशी आतापर्यंत रू. २५,५५१/- इतकी रक्कम संस्थेस देऊन एक प्रकारे समाज सेवेचा नवीन परिपाठ सर्वांसमोर उभा केला. ही दातृत्वाची शृखंला इथंच थांबली नाही. त्यानंतरही त्यांनी प्रत्येक महिन्याला रू. ३,०००/- संस्थेस देण्याचा त्यांचा मानस बोलून दाखविला व हे सातत्य त्यांनी आजवर गेल्या ४/५ वर्षात नित्य नियमाने एक व्रत म्हणून पाळले व आज त्यांचेकडून गुरूवार पेठेतील समस्त सणगर समाज, पुणे या संस्थेस बांधकामासाठी आजवर १,३०,०५१/- इतका निधी देत एक आगळा वेगळा विक्रम केला आहे. ही रक्कम दान देतांना त्यांनी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून पगारातील काही अंश दरमहा नित्यनियमाने कोणताही गाजावाजा न करता समाजाच्या पदरात टाकला हे विशेष. एक परिचारिका सामाजिक भान जपत समाज सेवेचा एक नवा अध्याय सर्वासमोर उभा करीत आहे याचं मोल व आदर्श आम्हास लाख मोलाचे आहे. आज त्या आमच्या समाजाच्या नवीन बांधलेल्या जागेतील सुवर्ण अक्षरात नाव कोरण्याच्या उपक्रमातील महत्वाच्या मानकरी आहेत याचा आम्हालाही मनापासून अभिमान वाटत आहे,
राजश्री सादिगले व माझी ओळख सन २००९-१० ची. मी मंत्रालयात सहकार विभागात उपसचिव असतांना त्या त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीच्या कामासाठी मंत्रालयात आल्या होत्या. माझ्या नावाचा तेथील बोर्ड बघुन त्या माझ्याकडे समाजातीलच कोणी तरी असावे या भावनेने आल्या, मला भेटल्या. त्यांच्या कामाचे स्वरूप व त्यातील अडचण सोडविण्यासाठी मी हातभार लावला, धीर दिला व कामही मार्गी लावले, जो माझ्या कर्तृव्याचाही भाग होता. तेव्हापासून एक सेवाभावी, निर्भिड, खंबीर मनाच्या, स्पष्टवक्त्या व धडाडी स्वभावाच्या राजश्री सादिगले यांचा माझा परिचय झाला. हाती घेतलेल्या कामाचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत ते काम करण्यासाठी त्यांची चिकाटी वाखाणण्यासारखी. त्याचा एक साथीदार म्हणून मला त्यांचे नेहमीच कौतुक होते. माझ्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबतचा लोकमत वाहिनीवरील “ बाईट “ मला अजूनही आठवतो. त्यावेळी मी नागपुर येथे विधान सभेत हा प्रश्न काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून विधा मंडळात मांडण्याचा प्रयत्न केला होता व तो यशस्वीही झाला होता. त्यावेळी त्याची दखल शासनालाही घेऊन काही शासन निर्णयही बदलाचे लागले होते. आता त्याची जागा या गोष्टीमुळे नकळत आदरात केव्हा घेतली गेली ते मलाच समजले नाही.
असेच दातृत्वाचे आणखी एक उदाहरण म्हणजे आपल्या समाजातील
कै. आबासाहेब दाभाडे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
कै. आबासाहेब दाभाडे यांनी त्यांना मिळत असलेल्या सेवानिवृती वेतनातून
आजवर मे २०१९ पासून ते मे २०२३ पर्यंत ते जिवंत असेपर्यंत
दरमहा रू. १,०००/- प्रमाणे रू.३०,०००/- इतकी
रक्कम संस्थेकडे बांधकामासाठी दरमहा जमा केली होती.
आबासाहेब जेव्हा शेवटी आजारी पडले तेव्हाही त्यांनी
त्यांचा शब्द ते जिवंत असेपर्यंत पाळला व समाजासाठी याची तरतुद
आमचे विश्वस्त श्री. किसन खुळपे यांचेकडे
करून ही रक्कमची तरतुद करूनच ते गेले.
कै. आबासाहेबांनी समाजासाठी
केलेला हा त्याग आम्हास केव्हाच विसरतां येणार नाही.
अशाच प्रकारे या दोन्ही व्यक्तींचे आभार मानून त्यांच्या या मोलाच्या दातृत्वाचे तोलणे आम्हास केवळ अशक्यप्राय असल्याने आम्ही समस्त सणगर समाज त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या दातृत्वाची तुलना करणे केवळ अशक्य आहे. या व्यक्तिंनी समाजाच्या बांधकामाला दिलेली देणगी म्हणून मी या लोकांचे कौतुक करीत नाही तर मनाचा मोठेपणा व समाजाप्रती अतुट प्रेम व आपलेपणा व त्याची व्यापक दृष्टी या लोकांकडे होती म्हणून या लोकांचे मला विशेष अप्रुप वाटते आणि नकळत त्यांच्यालमोर नतमस्तक व्हायला होते. कर्णाचे दातृत्व असणारी ह्या व्यक्ती माझ्या समाजातील आहेत याचा आम्हास कायम अभिमान आहे.
आज ५४१, गुरूवार पेठ, पुणे येथील
“ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर “ व
“ सणगर समाज सांस्कृतिक भवन “
वास्तुचे बांधकाम या व अशा काही विठ्ठल रुक्मिणीच्या रूपातील त्यागमुर्तीमुळे पुर्ण झाले आहे याची जाणीव आम्हास कायम आहे. सौ. सादिगले व कै. आबासाहेब यांच्यासारख्या असंख्य लोकांचा हातभार या पवित्र वास्तुला लाभला म्हणून ही समाजाची वास्तु आज उभी राहिली. समाज व समाजाबाहेरील लोकांनी आमच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला म्हणून हे काम आम्हीही पुर्ण करू शकलो. हे सर्व श्रेय अशा लोकांचे आहे म्हणून समाजाचे मोठे काम उभा राहिले.
या दोन अद्वितीय लोकांचा हा सर्व विश्वास, आशावाद, समाजासाठीची प्रसिद्धीपासून दूर राहूनही त्यांच्या देणगीतील सातत्य आम्हास सौ. राजश्री सादिगले व श्री. आबासाहेब दाभाडे यांच्यासारख्या दातृत्वाच्या महामेरूकडून मिळाले हा आम्ही आमचाच गौरव समजतो. या लोकांचे मोठेपण कायम मिरवण्याचे भाग्य या निमित्ताने आम्हास मिळाले जे आम्हास नक्कीच विसरतां येणार नाही...
ही इमारत उभी राहतांना अशा असंख्य लोकांचे याला हातभार लागला म्हणून ही समाजाची अलौकिक वास्तु उभी राहिली.
समस्तच्या प्रवासात अशी बरीच मंडळी आम्हास भेटली ज्यांनी समाजाच्या जडण घडणीत अव्यक्त राहून सोनेरी पानानी इतिहास लिहिला.
आजही समाजात अशा काही व्यक्ती आहेत म्हणून ही जगरहाटी चाललीय ती
अशा काही निस्वार्थी समाजातील लोकांमुळे…
आज समस्तच्या बांधकामात सौ. सादिगले व श्री. दाभाडे यांचे दिलेल्या शब्दास जागणारे मोल आम्हाला लाखमोलाचे वाटते...
खऱ्या अर्थाने देणाऱ्याने देत जावे...
घेणाऱ्याने घेत जावे...
घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे’
हे का म्हणतात हे आम्हास आज उमगले.
ज्या मातीत, ज्या समाजात जन्मलो ती माती,
तो समाज आणि ज्या माणसांमध्ये वाढलो ती कधी विसरायची नसतात याचा प्रत्यय आम्हास अशा लोकांकडे पाहिल्यानंतर आला आणि या लोकांबरोबर आम्हीच धन्य झालो..
दोघांच्याही दातृत्वास शतश: सलाम ...
चंद्रकांत सणगर
अध्यक्ष, समस्त सणगर समाज, पुणे
भरघोस देणगी ५ लाख सणगर समाज सातारा याना.
भरघोस देणगी
रुपये ५ लाख
सणगर समाज सातारा याना..
मनःपूर्वक अभिनंदन
१४|०७|२०२३
*श्रीमती मुक्ताबाई मारुती परमाळे*[ वय वर्षे ८७]
यांनी..
आयुष्य भर साठविलेली पुंजी आज अध्यक्ष *श्री भरत सेठ* याना सुपूर्द केली आणि आशिर्वाद ही दिले ..
भविष्यकालीन त्यांच्या पाश्चात अध्यक्षांना काळजी घेणेचि विनंती ही केली ..
आज त्या दरमहा ₹ १००००/-परिवारिक निवृत्ती वेतन घेत असून अजूनही समाजास मदत करण्याची त्यांची तीव्र ईच्छा त्यांनी बोलून दाखविली
खरंच ह्या थोर दानशूर माऊलींचे आभार मानावे एवढे कमीच आहेत
सोबत उपस्थित दत्ता कारंडे व इतर नातेवाईक यांचे सुद्धा आभार..🙏
त्यांना दीर्घायुष्य लाभो ह्या त्यांना मनःपूर्वक शुभेच्या ..🙏
माऊली शतायुषी व्हा
निरोगी रहा..!
-अभिनंदन ग्रुप
( सौजन्य:सातारा शहर सणगर समाज )