"कोणताही मोठा संकल्प एकट्याने पूर्ण होत नाही. समाजाची ही 'डिजिटल घोंगडी' विणताना अनेक निःस्वार्थ हातांनी आणि विचारांनी एकत्र येऊन काम केले आहे. 'आम्ही सणगर' हे व्यासपीठ उभारण्यात आणि समाजाला एकाच धाग्यात गुंफण्यात ज्यांनी आपला वेळ, कौशल्य आणि मेहनत दिली आहे, त्या सर्व शिलेदारांची आणि कार्यकारिणीची ओळख आम्ही येथे अभिमानाने करून देत आहोत."