सन्नकी म्हणजे मेंढी. मेंढीपालन हे धनगर लोक करतात. "सणगर" ही धनगराची पोटजात आहे. त्यांचा पारंपारिक व्यवसाय घोंगडी विणकाम करणे हा आहे.
(संदर्भ : शासन निर्णय समाज कल्याण, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडा व पर्यटन विभाग क्र. सी.बी.सी. १०/९ (२०३)/मा.व.क.५, दि. ५ मे १९९०)
सदर निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने “सणगर" ऐवजी “सनगर" असा शब्द वापरला आहे. जो जन्माने आणि कर्माने घोंगडी विणणारा आहे, शिवाय जो उभ्या व आडव्या धाग्यांनी विणकाम करतो त्यास विणकर म्हणतात. सन्नग म्हणजे तागा, सनगर म्हणजेच लोकरीच्या सुताचा तागा (घोंगडी) तयार करणारा.
धनगर लोक मेंढी पालन करून, मेंढीच्या अंगावरील लोकर काततात व त्याचे सूत बनवितात. हे सूत सणगर लोक खरेदी करून त्यापुढील घोंगडी विणकामाची प्रक्रिया करतात.
वेदपूर्वकालीन भारतीय समाजाची घडण चार वर्णात होती.
१) ब्राह्मण २) क्षत्रिय ३) वैश्य ४) शुद्र.
आपला सणगर समाज हा वैश्य वर्णात मोडतो व हल्लीसुद्धा समाजाची घडण त्याच स्वरूपात आहे. सणगर समाजाचा उल्लेख जुन्या ग्रंथात हजारो वर्षापासूनचा आढळून येतो. तेव्हापासून हा समाज केवळ विणकामाचा व्यवसाय करीत आला आहे. इतर व्यवसायाशी त्याचा मुळीच संबंध नव्हता. सणगर समाज हा सरळ, गरीब, प्रामाणिक व दुसऱ्यावर आक्रमण न करण्याच्या प्रवृत्तीचा असून तो अठरा आलुतेदारांपैकी एक आहे.
|| कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांशी का दिली वांगुली रे ॥ ही संतश्रेष्ठ ज्ञानोबामाऊलींची ओवी पाहता, तसेच भगवान श्रीकृष्णाच्या वर्णनात “काळी घोंगडी हाती काठी । लागलाधेनुच्या पाठी” असा उल्लेख आहे. याचा अर्थ यादव कालिन हा समाज होता व प्राचीन काळापासूनघोंगडी विणकाम हा व्यवसाय होता.
मुंबईतील सेंट्रल सिनेमात १८ मे १९३८ रोजी प्रसारीत झालेला "गोपालकृष्ण" या सिनेमात कृष्णाचा सवंगडी पेंद्याच्या खांद्यावर घोंगडी दाखविली आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते. प्राचीन ग्रंथामध्ये महाभारताचा युद्धाकाल या विषयी जे भाष्य आहे त्यावरून महाभारत हे १० सप्टेंबर इ.स.पूर्व ३००८, कार्तिक कृष्ण १५ रोजी अमावस्यास सुरू झाले असा उल्लेख सापडतो. म्हणजेच घोंगडी विणकामाचा व्यवसाय इ.स.पूर्व ३००८ सालापासूनचा आहे असे दिसून येते. त्याशिवाय श्री खंडोबा हे आराध्य दैवत असून भाविकांमध्ये घोंगडीचा उपयोग जादा प्रमाणात आहे. तसेच भंडाऱ्याचाही वापर होतो.
"कानडा हो विठ्ठलू, कर्नाटकू" या आशाताईंच्या अभंगाचा मतितार्थ लक्षात घेता पूर्वी घोंगडी विणकामाचा व्यवसाय कर्नाटकात जादा प्रमाणात असल्याचे दिसून येते.
वेदपूर्व काली मानवी गरजातून १२ बलुतेदार व १८ अलुतेदार अशी समाज रचना झाली. सणगर समाज हा १८ अलुतेदारापैकी, धनगराची पोटजात म्हणून आहे. प्राचीनकाळी पाऊस पाण्याचा अंदाज घेत, अन्नधान्यासाठी शेती करण्यास सुरूवात झाली. नद्यांच्या काठाकाठाने तसेच नद्यांच्या आसपास पाण्याच्या उपलब्धतेनुसार मनुष्यवस्ती होत राहिली. गांवे वसु लागली. शेतजमिनीने घेरलेले ठिकाण म्हणजे गांव, शेती करणाऱ्या कुटूंबाचा समुच्चय. ग्रामीणवस्तीचे तीन घटक असत.
१)पांढरी - निवासभूमी
२) काळी - शेत जमीन
३) गांवठाण - गायरान, कुरण. जमिन कसणारा तो खेडूत आणि तो राहतो ते ठिकाण म्हणजे खेडेगांव
कुणबी - कु म्हणजे पृथ्वी, जमीन. पृथ्वीला/शेतजमिनीला नमन करणारा तो कुणबी. कुणबीकी म्हणजे शेती करणे.
शेती करण्यासाठी विशिष्ट सेवांची गरज भासू लागली. तो करणारा (कारू) ग्रामचाकर, ग्रामसेवक वर्ग उदयास आला. ज्यांच्या सेवा वाचून शेतकऱ्यांचे अडत असे. खेडेगांव म्हणजे फारशी लोकसंख्या त्यावेळी नव्हती. त्यांच्या विशेष गरजा भागविण्यासाठी जाती-विहीत कसबानुसार कारू कामे करीत असत. त्याबद्दल त्यांचा मेहनताना म्हणून कुणब्यांकडून पिकांचा जो वाटा वंशपरंपरेने त्यांना मिळतो, त्याला बलुते म्हणतात. बलुत्यालाच घुगरी, पेंढीकाडी, सळई, शेर, हक्क इत्यादी प्रती शब्द आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सारख्या दक्षिणी भागात पारंपारिक रूपात बलु शब्दाबरोबर १२ हा संख्यावाचक शब्द जोडलेला आहे. बलुते शब्द हा प्रथम ज्ञानेश्वरीत आला आहे. (अध्याय १३, ओवी ३४)
ज्याला बलुते मिळते ते १२ बलुतेदार असे
१) महार २) सुतार ३) लोहार ४) चांभार ५) चौगुला ६) कुंभार ७) न्हावी ८) सोनार ९) जोशी १०) परीट ११) गुरव व १२) कोळी
विविध बलुतेदारांच्या वेगवेगळ्या निशाण्या किंवा प्रतिके असत. उदाहरणार्थ १) कुंभार चाक २) न्हावी - आरसा ३) सुतार - पट्टाशी ४) चांभार - टोच्या, धागा ५) धोबी - धोपाटणे ६) मुलाणी - चाकू ७) गुरव - धुपारती (धूपदाणी) इत्यादी.
गोत सभेच्या निवाडा पत्रात (महजर) हजर असलेल्या बलुतेदारांच्या नावांपुढे त्यांची निशाणी काढली जाई. उदा. कुंभार - चाक, न्हावी - आरसा इत्यादी.
-
आलुतेदार म्हणजे अनुषंगीक कामे करणारे. ज्यांच्यावर कसल्याही कामांची जबाबदारी दिली गेलेली नव्हती. म्हणून त्यांना नारू किंवा आलुतेदार म्हणत. ते असे १) तेली २) तांबोळी ३) साळी ४) धनगर ५) शिंपी ६) माळी ७) गोंधळी ८) डवरी ९) भट १०) ठाकर ११) गोसावी १२) जंगम १३) मुलाणी १४) वाजंत्री १५) घडशी १६) कलावंत १७) तराळ व १८) भोई.
सणगर ही धनगराची पोटजात असल्यामुळे ते आलुतेदारात मोडतात. सणगर जातीला व्यवसाय ठरवून दिला होता. त्यात वर्षानुवर्षे फरक पडला नाही. घोंगडी तयार करणे व विकणे यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे.
(संदर्भ : गांवगाडा : लेखक कै. त्रि.ना.अत्रे, वरदा प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती - सन १९८९)
सन १९५८ पर्यंत सणगर समाजास मागासवर्गीयांच्या सवलती मिळत होत्या. सन १९५३ मध्ये केंद्र सरकारने अनुसुचित जाती, जमातीचा अभ्यास करण्यासाठी पहिला मागासवर्गीय आयोग आचार्य काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरूकडून नेमण्यात आला. या कमीशनने ४२,३७९ मैलांचा प्रवास करून, ९८५ उत्तरांचा, ३४१४ निवेदनांचा अभ्यास करून आणि ५६३५ व्यक्तींच्या मुलाखती घेवून १९५५ साली सरकारला अहवाल सादर केला. त्यात २३९९ मागास गटांचा अन्य मागासवर्गीय म्हणून उल्लेख केला. अज्ञानामुळे व असंघटितपणामुळे आणि समर्थ नेतृत्वाच्या अभावामुळे सणगर समाज कालेलकर कमीशन पर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे कमीशनला सणगर समाजाच्या वस्तूस्थितीची कल्पना आली नाही. परिणामी या कमीशनने हा समाज बी.सी. यादीतून पूर्णपणे वगळून ओ.बी.सी.च्या यादीत समाविष्ट केला. काकासाहेब कालेलकर कमीशनने केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात ओ.बी.सी.साठी काही विशेष सवलती नोंदविल्या. पण केंद्र सरकारने याचा विचारच न केल्यामुळे सणगर समाजास मिळत असलेल्या पूर्वीच्या बी.सी. सवलती रद्द झाल्या त्यामुळे सणगर समाज शिक्षणापासून अधिकच दुरावला गेला. त्यावेळी राज्यसरकारच्या ३४ टक्के राखीव जागेत ओ.बी.सी.ला १० टक्के कोठा राखीव होता. त्यामुळे या समाजास विमुक्त व भटक्या जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २५ मे १९९० च्या निर्णयापर्यंत विशेष आवश्यक त्या सवलती मिळाल्या नाहीत. शासनाने जाहीर केलेल्या ओ.बी.सी. च्या यादीत सणगर समाजाचा क्रमांक १३९ वा होता. दि. ०६/०८/१९९२ च्या शासन निर्णयानुसार खालील जातींचा भटक्या जमातीच्या यादीमध्ये समावेश झाला असल्यामुळे त्या जाती इतर मागास वर्गीयांच्या यादीतून वगळल्या. धनगर (क्र. ३२), हटकर (क्र. ४८), कुरमार (क्र. ८४), सनगर (क्र. १३९), अहिर (क्र. १९८).
१९७७ सालच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यात जनता पार्टीने कालेलकर आयोग शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे व मागासवर्गीयांना राखीव जागा देण्याचे आश्वासन दिले व केंद्रात निवडून आलेल्या मोरारजी देसाईंच्या जनता सरकारने बी.पी.मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा मागासवर्ण आयोग २० डिसेंबर १९७८ रोजी स्थापन केला. या आयोगाने ८४ जिल्ह्यांची मुख्य ठाणी व ३० खेडेगावांना भेटी देवून व २६३८ निवेदनांचा अभ्यास करून, ९७ खासदार व १,७१७ जण यांच्या साक्षी घेवून आणि विविध तऱ्हेच्या प्रश्नावल्यांना आलेल्या माहिती वरून निष्कर्ष काढले व त्या आयोगाने आपला अहवाल १२ डिसेंबर १९८८ मध्ये त्यावेळी पंतप्रधान पदी असलेल्या श्रीम इंदिरा गांधी यांना सादर केला. त्या अहवालामध्ये मंडल आयोगाने ३,७४३ जाती जमातीना मागासवपति समाविष्ट केले व त्यांची लोकसंख्या भारतातील एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के असल्याचे दाखवून दिले
मुंबई विभाग - मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनशगर, बदलापूर, ठाकूली, नेरूळ, नवी मुंबई, कलवा, मुंब्रा, ऐरोली, धनसोली, भिवंडी, गणेशपुरी, वसई, पालघर, वासिंद, शहाड, वाडा.
रायगड जिल्हा - पेन, पनवेल, कळंबोली, कर्जत, खोपोली, अलिबाग, दहिवली, मजगांव, दहिवली कार्डे, कापडी बुद्रुक
पुणे जिल्हा - पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, लोणावळा, तळेगांव दाभाडे, बहुली, मुद्रा, उरावडे, वरवे, भोर, खेडशिवापूर, वीर, वाल्हे, मोरगांव, पणदरे, बारामती, वालचंदनगर, वालचंद जंक्शन, भवानी नगर, इंदापूर, भिगवण, उरळी कांचन, मांजरीफार्म, शिरूर, सरदवाडी, शिक्रापूर, तळेगांव ढमढेरे, कोरागांव भिमा कोरेगाव, सणसवाडी, पेरणेफाटा, मरकळ, रासे, चाकण, करंदी, वाघोली.
सातारा जिल्हा - शहर, अतित, कोरेगांव, रहिमतपूर, जाबकिनई, सातारा रोड, पुसेगांव, वडुज, खटाव, चितळी, मायणी, कलेढोण, अंबवडे, निमसोड, पुसेसावळी, दहिवडी, म्हसवड, कुकुडवाड, जांबुळणी, पिंपरीपर्यंत, धायगुड्याची पाडळी, फलटण, कराड, ओगलेवाडी, बनवडी, निगडी, मसूर, शिवडे, तारगांव, उंब्रज, सणगरवाडी, चरेगाव, टाळगांव, पाटण, मनव, शिरगांव, तारळे, ढेबेवाडी, मल्हारपेठ, वाई, कवठे, उरूल, कोयनानगर, खंडाळा, वाठार, कातरखटाव, गारूडी.
सांगली जिल्हा - सांगली शहर, माधवनगर, बुधगांव, बावची, मिरज, तासगाव, अंकलखोप, पलुस, तांबवे, कवठेएकंद, चिंचणी, विटे, कडगांव, देवराष्ट्रे, अळसंद, वागणी, तडसर, नेवरी, येतगांव, वेजेगांव, इस्लामपूर, आष्टे, ओझर्डे, भवानीनगर, आटपाडी, दिंघची, झरे, खरसुंडी, करगणी, शिराळा, कोकरूड, कवठेमहंकाळ, ढालगांव, ढालेवाडी, लंगरपेढ, नागज, नागजफाटा, जत, येळावी, खडनाळ, पांढरीचीवाडी.
कोल्हापूर जिल्हा - कोल्हापूर, हातकणंगले, पेठवडगांव, परिते, सांगरूळ, महारूळ, किसरूळ, इचलकरंजी, कागल, कोडोलीवारण, कोडोलीदत्तमटी, सेनापतीकापशी, मुरगुड, भूदरगड, शेणगांव, गारगोटी, पन्हाळमहाळ, मसुदमाले, भोंगाव, कळे, राधानगरी, तारळे, बहिरेश्वर, शाहूवाडी, मलकापूर, सरूडकापशी, निळे, पारगांव
सोलापूर जिल्हा - सोलापूर शहर, मोहोळ, बार्शी, टेंभूर्णी, करकम, पंढरपूर, कुर्डुवाडी, पिलीव, गुंजेगाव, अकलूज, सांगोला, घेरडी, बलवडी, जवळे, मंगळवेढा, बेकपूर, लक्ष्मीदहिवडी, वेळापूर, धर्मपूरी, माळशिरस, करमाळा, पारेवाडी, वैराग, नाझरे, चिकमहूद.
सिंधुदूर्ग जिल्हा - कळेरे, देवगड, फोंडाघाट, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोडा, बांदा.
रत्नागिरी जिल्हा - रत्नागिरी शहर, लांजे, ओणी, वांद्री, साखरपा, चिपळून, वाखेड, चिखलीखरागंव, कुरंगावणे, वाटूळ, भराडे, अलोरे, आंजर्ले, दापोडी, लोटे, संगमेश्वर, दाभोळ, राजापूर, खारेपाटण.
अहमदनगर जिल्हा - अहमदनगर शहर, खर्डा, जामखेड, राजूरी, कर्जत, श्रीगोंदा, कोपरगांव, पुणतांबे, रामपूरवाडी, प्रवरानगर, बाळभेश्वर, भाळवणी, बरगेवाडी
बीड जिल्हा - बीड शहर, आष्टी, नवगण, राजूरी, देवळा, ब्रह्मगांव
नाशिक जिल्हा - नाशिक शहर, ओंझर्डे, सिन्नर, नाशिक रोड
औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद शहर, चिखलठाणा
उस्मानाबाद जिल्हा - परांडा
लातूर जिल्हा - लातूर
महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, कर्नाटक, राजस्थान इ. राज्यामध्ये काही प्रमाणात वस्तीस्थाने करून रहात आहेत. तसेच कामानिमित्त देशाबाहेरही अमेरिका, ब्रिटन इ. राष्ट्रांमध्ये समाजातील काही कुटुंबे आहेत.
आडनांव म्हणजे वंशाचे नाव असेही म्हटले गेले आहे. माणूस आपल्या जन्माबरोबरच ते घेऊन येतो व मरेपर्यंत बाळगतो. आड चा अर्थ आहे पडदा अथवा सीमारेषा, ज्या नामाद्वारे दोन व्यक्तीमध्ये विभाजन वा रेषा (आड-पडदा) ओढली जाते त्यास आडनांव म्हणतात. महाराष्ट्रात उपनाव, आडनाव लावण्याची प्रथा बरीच जुनी आहे. उत्तर चालुक्य, यादव काळातल्या काही शिलालेख, ताम्रपट लेखातून त्याचे उल्लेख येतात.
कोणत्याही जातीची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी आडनाव हे एक साधन आहे. सणगर समाजात अशी सध्या तरी ६२ आडनावे दिसून येतात. ती खालीलप्रमाणे
१) बल्लाळ २) बदडे ३) बामणे ४) बंडे ५) भोंगाळे ६) चांगले ७) दाभाडे ८) ढाले ९) डमकले/डमाकले १०) डांगोळे ११) देवकर १२) दैन १३) धतिंगे १४) धुकटे-धोकटे १५) ढोबळे १६) ढवण १७) इकारे १८) गुरवे-गुळवे १९) गवरे २०) गाजरे २१) गोंजारे-गोंजारी २२) घुटे- (४४) कारंडे ३१) कुले ३२) खामकर ३३) खुळपे-कुलपे ३४) कोल्हापूरे ३५) लिमकर ३६) मायणे घंटे २३) हिंगसे २४) जमदाडे २५) काळे २६) कचरे २७) कमले २८) केंडे २९) कापरे ३ पालसांडे-पानसांडे ४५) पांढरे ४६) परमाळे ४७) पुणेकर ४८) पिचके ४९) पावटे ५०) राऊत ३७) माडगुळे ३८) म्हेत्रे ३९) माणकरी ४०) माईणकर ४१) नडे ४२) नाळे ४३) नवाळे ५१) सासणे ५२) सादिगले- सादिकले- सादिलगे ५३) सोळसे ५४) तरटे ५५) त्रिगुणे ५६) वंशे ५७) वडगावे ५८) येवगे ५९) यौगे ६०) सणगर-सनगर ६१) शेडे ६२) वाघुले.
समाजातील कुळीबाबत शास्त्रीय आधार सापडू शकत नाही. तथापि त्या नऊ असाव्यात. तसेच सणगरांचे गोत्र कोणते आहे याबाबत समाज अनभिज्ञ आहे. हे जाणून घेण्यासाठी श्री. मनोहर काले यांनी समाजातील बऱ्याच जेष्ठांशी संपर्क साधला. तसेच काशी-वाराणसी आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील पड्यांशीही संपर्क साधला. परंतू समाधानकारक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र पंड्यांच्या डायरीमध्ये समाज बांधवांनी सांगितल्याप्रमाणे "कश्यप” या सर्वसाधारण गोत्राची नोंद सापडते. समाजातील अंदाजित ज्या कुळी म्हणावयाच्या त्या खालीलप्रमाणे....
१) कारंडे = शेडे-नाळे-वाघुले-बंडे-दैन-ढाले-माडगुळे
२) गवरे = परमाळे-हिंगसे-ढवण- त्रिगुणे
३) पालसांडे = यौगे-पुणेकर-काळे
४) खुळपे = कुलपे-धतिंगे-वडगांवे
५) लिंमकर = त्रिगुणे-सोळसे
६) ढोबळे = कमले
७) धुकटे = इकारे-नडे
८) सासणे = पांढरे
९) पिचके = मायणे
वरील बांधवांची कुळी एकच असल्यामुळे त्यांच्यामध्ये विवाहस्वयंवर संबंध जुळत नाहीत.
टिप - सणगर-सनगर हे आडनांव नसून हे जातीचे नाव आहे.
काही समाज बांधव सणगर-सनगर हे आडनांव जरी लावत असले तरी त्यानी त्यांच्या नावापुढे कंसात त्यांच्या मुळ आडनावाचा उल्लेख करावा.
महाराष्ट्रात सणगर समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळ्या बाबत मिळालेली थोडक्यात माहिती.
*आज पर्यंत राज्यस्तरीय वधू-वर पालक व सामुदायिक विवाह सोहळे हे एकुण १७ झालेले आहेत ते खालील प्रमाणे*
*१) ११\०५\१९४७ ठिकाण = कराड येथे संपन्न झाला यावेळेस ०७ विवाह झाले होते*
*२) १८\०२\२००१ ठिकाण = कोल्हापूर येथे संपन्न झाला यावेळेस ०६ विवाह झाले होते*
*३) १९\०५\२००३ ठिकाण = सांगली येथे संपन्न झाला यावेळेस ०५ विवाह झाले होते*
*४) २९\०२\२००४ ठिकाण = श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाला यावेळेस ३६ विवाह झाले होते*
*५) १३\०२\२००५ ठिकाण = कागल येथे संपन्न झाला यावेळेस १६ विवाह झाले होते*
*६) २२\०४\२००६ ठिकाण = पुणे येथे संपन्न झाला यावेळेस ०८ विवाह झाले होते*
*७) १९\०५\२००६ ठिकाण = श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाला यावेळेस २२ विवाह झाले होते*
*८) ०६\०५\२००७ ठिकाण = सांगली येथे संपन्न झाला यावेळेस ०५ विवाह झाले होते*
*९) १०\०५\२००९ ठिकाण = पेठ - वडगांव येथे संपन्न झाला यावेळेस १२ विवाह झाले होते*
*१०) २९\०५\२०१० ठिकाण = पुणे येथे संपन्न झाला यावेळेस ०३ विवाह झाले होते*
*११) २६\०४\२०१२ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाला यावेळेस ०८ विवाह झाले होते*
*१२) ०८\१२\२०१३ ठिकाण = मसुदमाले येथे संपन्न झाला यावेळेस ०५ विवाह झाले होते*
*१३) १४\१२\२०१४ ठिकाण = दिघंची येथे संपन्न झाला यावेळेस ०९ विवाह झाले होते*
*१४) २६\०५\२०१६ ठिकाण = म्हसवड येथे संपन्न झाला यावेळेस १० विवाह झाले होते*
*१५) २९\०५\२०१९ ठिकाण = सांगोला येथे संपन्न झाला यावेळेस ०७ विवाह झाले होते*
*१६) २९\०१\२०२३ ठिकाण = मलकापूर येथे संपन्न झाला यावेळेस ०१ विवाह झाले होते*
*१७) १४\०२\२०२३ ठिकाण = श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संपन्न झाला यावेळेस ११ विवाह झाले होते*
*१८) दिनांक ०७\०४\२०२४ रोजी सोलापूर शहर सणगर समाज यांनी पहिल्यांदाच फक्त वधू-वर परिचय मेळावा घेतला होता.*
*१९) दिनांक ०२\०५\२०२४ रोजी सांगोला येथे वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला यावेळेस ०२ विवाह झाले होते.
माहिती सोर्स - समस्त सणगर समाज माहिती पुस्तक