आम्ही सणगर समाजाची परिपूर्ण माहिती असणारे संकेतस्थळ.
"डिजिटल मागावर विणूया, सणगर समाजाच्या अखंड एकजुटीची घोंगडी!"
ताणा परंपरेचा, बाणा प्रगतीचा: 'आम्ही सणगर' परिवारात आपले स्वागत आहे!
कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या लोकरीतून आपण पिढ्यानपिढ्या समाजाची 'घोंगडी' विणत आलो आहोत. याच गौरवशाली परंपरेतून प्रेरणा घेत, संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांना एकाच धाग्यात गुंफण्यासाठी 'आम्ही सणगर' (www.amhisangar.in) हे डिजिटल व्यासपीठ उभारले आहे.
ज्याप्रमाणे पारंपरिक मागावर 'ताणा' आणि 'बाणा' एकत्र येऊन सुंदर कलाकृती घडते, त्याचप्रमाणे या वेबसाईटच्या माध्यमातून आपण एकजुटीची नवी 'डिजिटल घोंगडी' विणत आहोत.
या डिजिटल मंचावर तुम्हाला काय मिळेल?
वधू-वर सूचक: योग्य जोडीदार शोधण्यासाठी सुरक्षित व मोफत व्यासपीठ.
फोन डायरी: समाजबांधवांना जोडणारा संपर्काचा हक्काचा दुवा.
उद्योग व व्यवसाय: समाजातील उद्योजकांना एकत्र आणणारे नेटवर्क.
गौरवशाली इतिहास: समाजाचा उगम, घोंगडी व्यवसाय
बातम्या व उपक्रम: समाजातील घडामोडी आणि प्रगतीचे ताजे अपडेट्स.
'आम्ही सणगर' ही समाजाची नवी 'डिजिटल घोंगडी' आहे, जी सर्वांना प्रगतीची आणि एकजुटीची ऊब देईल. चला, या मंचावर मोफत नोंदणी करूया आणि एकतेचा हा धागा अधिक बळकट करूया!
*'आम्ही सणगर'चे अधिकृत आणि स्फूर्तिदायक गीत आता तुमच्या भेटीला!*
आम्ही सणगर'चे अधिकृत आणि स्फूर्तिदायक गीत आता तुमच्या भेटीला!*
सप्रेम नमस्कार समाजबांधवांनो!
आपल्या सणगर समाजाचा गौरवशाली इतिहास, कष्टाची परंपरा आणि 'डिजिटल युगातील' आपली नवी वाटचाल साजरी करण्यासाठी 'आम्ही सणगर' परिवाराचे एक खास गाणे तयार करण्यात आले आहे!
"ताणा परंपरेचा, बाणा प्रगतीचा..." या शब्दांतून आणि सुभाषजींच्या संकल्पनेतून साकारलेले हे गाणे आपल्या समाजाच्या एकजुटीची 'नवी घोंगडी' विणण्याचे काम करेल.
हे गाणे नक्की ऐका आणि प्रत्येक समाजबांधवाच्या मोबाईलवर पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा!
श्री दगडू लक्ष्मण खुळपे. (आप्पा)
संपूर्ण नाव श्री दगडू लक्ष्मण खुळपे ,(आप्पा)
जन्मतारीख 2/2/1947
सेवेची सुरुवात नव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नंतर ही शाळा रयत शिक्षण संस्थेकडे जोडली रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय पंढरपूर येथून सुरुवात नंतर पदोन्नतीने रावजी सखाराम हायस्कूल सोलापूर भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली परत पुन्हा यशवंत विद्यालय पंढरपूर एकूण 1970 पासून ते 2006 पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या सोलापूर जिल्ह्यातच सर्व सेवा पूर्ण
कौटुंबिक पार्श्वभूमी एक मुलगा दोन मुली सर्वांचे शिक्षण पदवी पर्यंत मुलगी एक विटा एक फलटण सून अंधेरी मुंबई त्यांचे आजोळ मोहोळ सासरवाडी बार्शी
सेवानिवृत्तीनंतर पूर्ण समाजसेवेसाठी,
समाजसेवा ही कशी करावी आणि त्याचा सखोल अभ्यास काय असतो हे दगडू लक्ष्मण खुळपे अतिशय चांगल्या प्रकारचे उदाहरण आहे, आपल्या समाजातील नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे अवगत असणारे (आप्पा) यांना कोणत्याही प्रकारची माहिती विचारल्यानंतर ते सहजच सर्व नातीगोती सांगून जातात म्हणून त्यांना सनगर समाजाचे सर्च इंजिन या नावाने संबोधित करण्यात आले आहे,, ज्यांना कुणाला समाज बांधवाला काही नात्यासंबंधी आपल्या समाजातील चौकशी करायची असेल तर त्यांचा नंबर खाली देत आहे त्या नंबर वर त्यांच्याशी संपर्क करू शकाल.
9405545314
सणगर समाज प्रगती संस्था ठाणे, (रजि.) वधु - वर परिचय मेळावा, 27 एप्रिल 2025 PDF उपलब्ध....
सांगोला तालुका वधू-वर PDF Edited New येथे उपलब्ध...
पुण्यामध्ये मुलांसाठी राहण्याची उत्तम सोय…
पुण्यामध्ये मध्य वस्तीत व
स्वारगेट एस.टी. स्टॅंडच्या जवळ
मुलांसाठी राहण्याची उत्तम सोय…
समस्त सणगर समाज, पुणे यांनी
नुकतेच बांधलेल्या
सर्व सोईनी युक्त वसतीगृहामध्ये
वाजवी दरात राहण्याची सोय..
ठिकाण : ५४१, गुरूवार पेठ, गवरी आळी,
पुणे -४११०४२.
प्रवेशासाठी संपर्क :
(१) श्री. नंदकुमार लिमकर -अध्यक्ष (९८५०४३१६७८)
(२) ॲड. डी.डी. ढोबळे -सदस्य (९४२२३०३६७१)
(३) श्री. किसन खुळपे - सदस्य (९८२२४७९९१५)
(४) श्री. नंदकुमार खुळपे - सदस्य (९८९०२८२६८३)
(५) श्री. विष्णुपंत ढोबळे -सदस्य (९०४९६८३२६८)
महत्त्वाची सूचना: > सध्या या वेबसाईटच्या अपडेटिंगचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये नजरचुकीने काही त्रुटी राहिल्यास किंवा माहिती अपूर्ण असल्यास, ती सुधारली जाईल. 'आम्ही सणगर' हे व्यासपीठ अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी आपल्या काही सूचना किंवा संकल्पना असतील, तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे. कृपया 9096654003 या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून आमच्याशी नक्की संपर्क साधावा.